ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

पद्मासन

पद्मासन
 - पद्म म्हणजे कमल. या आसनात पायाचे तळवे पाण्यावर पसरलेल्या पदमपत्राप्रमाणे दिसतात म्हणून याला पद्मासन म्हणतात.
कृती -

१) दोन्ही पाय समोर उघडून बसावे. पायाचे अंगठे व टाचा जुळवून ठेवावे. दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूस घेऊन तळहात जमिनीवर ठेवावे. मान सरळ व नजर समोर असावी.

२) दोन्ही पायांत थोडे अंतर घेऊन डाव्या पायाची घडी करावी. हाताचा आधार घेऊन पाऊल उजव्या मांडीवर व टाच जांघेपर्यंत आणून ठेवावी.

३) उजव्या पायाची पण अशीच घडी करून हाताच्या आधारे पाऊल डाव्या मांडीवर व टाच जांघेपर्यंत घ्यावी.

४) दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावेत.

५) १० मिनीटे आसनात बसावे.

६) तळहात परत जमिनीवर कंबरेच्या दोन्ही बाजूस ठेवावे.

७) मांड्यांची घडी सावकाळ उलगडत सरळ करावे. पूर्वस्थितीत यावे.

या स्थितीत बसूनच ध्यानधारणा व अनेक आसने करावी लागत असल्याने ही योगा करण्याची पहिली पायरी म्हणावी लागेल.

फायदे -

१) ध्यानोपयोगी आसन आहे. प्राणायाम, प्रार्थना, ध्यानधारणा, पूजापाठ, जपजाप्य यासाठी शरीराला लागणारी स्थिरता मिळते.

२) मन शांत होण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment