ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

उष्ट्रासन

उष्ट्रासन

१) दोन्ही पाय गुडघ्यांत घडी घालून बसावे. दोन्ही पायांचे अंगठे हे एकमेकांना चिकटलेले ठेवावेत. टाचा एकमेकांपासून दूर ठेवून त्यावर बसावे, म्हणजे वज्रासन तयार होईल. 

२) गुडघ्यांत थोडे अंतर घेऊन गुडघ्यांवर उभे रहावे.

३) तळहात तळपायावर टेकविण्याचा प्रयत्न करावा. तसे न जमल्यास पायांची बोटे उभे करून केले तरी चालेल.

४) मान मागे टाका. मान सैल सोडा. कंबर पुढे आणावी.

५) पाठीची जास्तीत जास्त कमान होईल असे करावे. हात सरळच ठेवावेत. वाकवू नयेत.

६) मांड्या जमिनीशी काटकोनात ठेवा. श्‍वसन नेहमीप्रमाणे चालू ठेवावे. याच स्थितीत १० ते १५ सेकंद राहून 
हळूहळू आसन सोडावे.

७) आसन सोडताना प्रथम मान व कंबर सरळ करत हात पुढे घेत गुडघ्यावर बसावे.

८) पूर्वस्थितीत म्हणजे वज्रासनात बसावे.

फायदे -

१) पाठीचा कणा लवचिक राहतो. खांदे व गळ्याजवळचा मेद कमी होतो.

२) थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत होते.

३) पचन संस्था व प्रजनन संस्था सुधारते.

४) छातीला चांगला ताण बसतो. त्यामुळे श्‍वसन तंत्र कार्यक्षम होते.

५) डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

No comments:

Post a Comment