ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

शवासन


शवासन हे एक योगासन असून ते साधारणत: योगसाधनेच्या बैठकीच्या आरंभी व अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता शवासारखा (प्रेतासारखा) पडून राहिल्यासारखा दिसतो, म्हणून त्याला शवासन असे म्हणतात.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात शरीराला व मनाला विश्रांती देणारे आसन म्हणजे शवासन.

कृती -

1) पाठीवर झोपावे. हात शरीरापासून ४ ते ६ इंचावर ठेवा. हातांचे तळवे छताच्या दिशेने ठेवा. हातांची बोटे अर्धवट मिटलेली ठेवा. पायांत एक ते दीड फूट अंतर ठेवा. टाचा आत, चवडे बाहेरच्या बाजूला झुकवावेत. मान सरळ किंवा सवयीप्रमाणे डावीकडे. उजवीकडे मस्तक झुकू द्यावे. डोळे मिटलेले.
2) पहिल्यांदा शरीर शिथिलीकरणाला सुरवात करायची आहे. मनाने त्या त्या अवयवाच्या इथे जाऊन, पोचून दोन्ही पाय हलके करा. पायांच्या बोटांपासून कमरेपर्यंतचा भाग हलका करा. आता दोन्ही हातांकडे लक्ष देऊन हातांच्या बोटांपासून खांद्यापर्यंतचा एकेक भाग स्नायू सैल करा. आता पोटाचे, छातीचे स्नायू सैल करा. आता पाठीचा भाग, एकेक मणका हलका करा. त्यानंतर संपूर्ण चेहरा, संपूर्ण शरीर शिथिल झाले की पुढच्या टप्प्यात श्‍वास प्रश्‍वास संथ चालतोय, त्याकडे साक्षिभावाने बघणे. 
3) त्यानंतर मनामध्ये संकल्प तीन वेळा करायचा. योगाभ्यासामुळे मला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त होत आहे. नंतर सोहमचा मानसिक जप करावा. श्‍वास घेताना ‘सो’ असे म्हणावे व श्‍वास सोडताना ‘हा’ असे म्हणावे. नंतर डोळ्यांसमोर कुलदैवत, माननीय व्यक्ती, गुरू आणावेत. त्यांना अभिवादन करावे. संकल्पाचे स्मरण करून हळुवार कुशीला वळून उठावे व सावकाश डोळे उघडावे.

फायदे -
१) रक्तदाब नियंत्रित राहतो.
२) हृदयरोग्यांना उपयुक्त आहे.
३) मनोकायिक आजारांवर उपयुक्त
४) शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, भावनिक फायदे मिळतात.
५) रक्ताभिसरण सुधारते.
६) मन एकाग्र करता येते

No comments:

Post a Comment