ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

भुजंगासन

◆■◆ भुजंगासन◆■◆
या आसनात पाठीच्या कण्याची स्थिती भुजंगासारखी होत असल्याने या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.

कृती -

१) पोटावर झोपावे. हनुवटी जमिनीवर टेकवावी. दोन्ही हात सरळ मांड्यांजवळ ठेवून तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले ठेवावेत. पायांचे अंगठे व टाचा एकमेकांना चिकटून ठेवावे, पण चवडे मागे ताणून ठेवावेत.

२) दोन्ही हात छातीशेजारी टेकवावेत. हातांची कोपरे आकाशाच्या दिशेने ठेवा. कपाळ टेका, श्‍वास सोडा व श्‍वास घेत प्रथम कपाळ व हनुवटी वर उचला. मान मागच्या दिशेने वाकवत खांदे, छाती हळूहळू वर उचला. हात कोपरात सरळ होईपर्यंत वर घ्या. श्‍वसन संथपणे सुरू ठेवा.

३) आसन सोडताना श्‍वास सोडत सावकाळ पूर्ववत स्थितीत या.

फायदे -

१) या आसनात पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे पचनांद्रियांवर चांगले परिणाम होतात. त्यामुळे पचनेंद्रियांवर चांगले परिणाम होतात. 

२) पाठीचा कणा लवचिक होतो.

३) पाठीच्या कण्यातील स्नायू कार्यक्षम होतात

No comments:

Post a Comment