ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..!मोफत आणि विना लॉस शेअर मार्केट शिकण्यासाठी संपर्क-9️⃣4️⃣0️⃣3️⃣6️⃣9️⃣3️⃣3️⃣4️⃣1️⃣

सुप्त वज्रासन

■◆■सुप्त वज्रासन■◆■
 कृती -
1) दोन्ही पाय गुडघ्यांत घडी घालून बसावे. (वज्रासन)
2) पायाचे अंगठे एकमेकाला चिकटलेले ठेवावे.
३) टाचा एकमेकींपासून दूर ठेवून त्यावर बसावे.
४) गुडघे एकमेकांस जुळलेले ठेवावेत. म्हणजे वज्रासन तयार होईल.
५) आता कोपराचा आधार घेऊन सावकाश पाठीवर झोपावे. डोक्याची मागील बाजू व खांदे जमिनीवर टेकवावे.
६) दोन्ही हातांनी डोक्याच्या पलीकडे हाताची घडी घालावी.
७) संथ श्‍वसन चालू ठेवावे. पाठीचा जास्तीत जास्त भाग जमिनीवर टेकण्याचा प्रयत्न करावा. पाठीची कमान करू नये. तसेच गुडघे उचलू देऊ नयेत.
८) आसन सोडताना हातांची बोटे घोट्याखाली दाबून धरून कोपराच्या आधाराने उठून बसावे.

फायदे -
१) पचनसंस्थेचे कार्य सुधारते.
२) कंबर, गुडघे, मांड्यांच्या स्नायूंना व्यायाम होतो.

No comments:

Post a Comment